
फेसबुकवर एखादी पब्लिक पोस्ट केल्यानंतर अनेक जण त्यावर कमेंट करतात. काही लोकांच्या कमेंट आपल्याला आवडत नाहीत. तेव्हा आपण अशा लोकांना ब्लॉक करतो. युजर्सची ही समस्या फेसबुक आता लवकरच दूर करणार आहे. फेसबुक नवं फीचर आणणार आहे, ज्यामध्ये युजर्स आपल्या पब्लिक पोस्टबाबत निर्णय घेऊ शकणार आहेत. आपल्या पोस्टवर कोणत्या व्यक्तीने कमेंट करावी किंवा करू नये, हे युजर्सला ठरवता येणार आहे.
युजर्सच्या हितासाठी फेसबुक नेहमी नवीन फीचर आणत असतं. आताही त्यांनी फिल्ड फिटर बार फीचर आणले आहे. त्याचा उपयोग करून आपल्या न्यूज फीड सॉर्ट करण्याचा आणि ब्राऊज करण्याचाही पर्याय मिळेल.
- उजव्या बाजूला ड्रॉप डाऊन मेन्यूवर क्लिक करा. तिथे सेटींग अँड प्रायव्हसीवर क्लिक करा. त्यानंतर पब्लिक पोस्टच्या डाव्या बाजूला क्लिक करा.
- ‘हु कॅन फोलो मी’वर जाऊन पब्लिक सिलेक्ट आहे का तपासा. त्यानंतर पब्लिक पोस्ट कमेंटवर क्लिक करा. तिथे कोणाला कमेंट करण्यासाठी परवानगी द्यावी, हे युजर ठरवणार आहे. या सेटींगनंतर युजर्सने परवानगी दिलेल्या लोकांनाच पब्लिक पोस्टवर कमेंट करता येईल.




























































