फडणवीसांनी अधिकार नसताना मराठा आरक्षण दिले- पृथ्वीराज चव्हाण

 

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना चुकीच्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा कायदा केला. अधिकार नसताना देण्यात आलेले हे आरक्षण न्यायालयात टिकले नाही, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी आंतरवालीत मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आंतरवालीत मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी आले होते. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला. मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी चुकीच्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा कायदा केला. राज्य सरकारला अधिकार नसताना करण्यात आलेला हा कायदा पुचकामी असल्यामुळे तो न्यायालयात टिकला नाही, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. या वेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार रजनी पाटील या होत्या. मनोज जरांगे यांच्या प्रपृतीची चौकशी करण्यासाठी आलो होतो. आमच्यात पुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. मनोज जरांगे-पाटील यांनीही त्यास दुजोरा दिला.