डब्बा ट्रेडिंग फसवणूक, आणखी एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुडी ऍप्सचा वापर करून फसवणूक करणाऱया आणखी एका ब्रोकरला क्राईम ब्रँच युनिट 11 ने बेडय़ा ठोकल्या. उपेंद्र खेणी असे त्याचे नाव आहे. त्याला ऍप्सच्या मोबदल्यात 3 टक्के कमिशन मिळत होते. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

कांदिवलीच्या महावीर नगर येथे एक जण मुडी ऍप्सचा वापर करून डब्बा ट्रेडिंग करत असल्याची माहिती युनिट 11 ला मिळाली. त्या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या पथकातील अधिकाऱयाने तेथे छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकून मुख्य सूत्रधाराला अटक केली. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी चार ब्रोकरना अटक केली होती. त्या ब्रोकरच्या चौकशीत उपेंद्रचे नाव समोर आले. उपेंद्र हा सुरतचा रहिवासी असून तो ब्रोकरचे काम करतो. त्याने ते ऍप्स मुख्य सूत्रधाराला वापरण्यास दिले होते. तो मीरा रोड येथील एका लॉजमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांनी मीरा रोड येथून खेणीला ताब्यात घेतले. त्याच्या अटकेने आरोपींची संख्या सहा झाली आहे.