राम जन्मभूमी ट्रस्टच्या नावाने उघडली फेक वेबसाईट, लाखो रुपयांचा चुना लावणारी टोळी जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही तरुणांनी राम मंदिर ट्रस्टची खोटी वेबसाईट बनवली आणि या वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी लाखो रुपये लुबाडले आहेत. या प्रकरणी सायबर सेलने पाच जणांना अटक केली आहे. सर्व आरोपी दिल्लीचे रहिवासी असून आरोपी सॉफ्टवेअर व्यवसायाशी निगडीत असल्याचे समोर आले आहे.

दिल्लीत राहणार्‍या आशिष, नवीन, सुमित, अमित झा आणि सूरज या पाच तरुणांनी मिळून काही महिन्यांपूर्वी राम मंदिराची खोटी वेबसाईट बनवली होती. या वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी भाविकांकडून देणग्या गोळा केल्या. भाविकांनी ऑनलाईन ट्रान्झेक्शनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात देणगी दिली होती. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी या पाचही जणांना अटक केली आहे. या टोळीने आतापर्यंत किती पैसे लूटले याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. असे असले तरी ही रक्कम लाखोंच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.