1 / 8
कांग्रा खोऱ्यात हे मंदिर आहे. ज्वालामुखी देवीचे हे मंदिर आहे. या मंदिरात स्वयंभू ज्योत असून ती अखंड जळत असते. या मंदिरात नवदुर्गेचा वास असतो अशी आख्यायिका आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये हे चामुंडा देवीचे मंदिर आहे. देशातील प्रसिद्ध मंदिरांच्या यादीत या मंदिराचा समावेश होतो. बाणेर नदीच्या किनाऱ्यावर ते उभारले आहे.
उत्तराखंडमधील मानसा मंदिर हे बडी लांबोर गावात आहे. मानसा देवीने येथील शेठ सूरमलजी यांच्या स्वप्नात येऊन त्यांना साक्षात्कार दिल्याचे बोलले जाते. त्यानंतर सुरमलजी यांनी हे मंदिर स्वखर्चाने बांधले. 1975 साली हे मंदिर उभारण्यात आले.
कर्नाटकमधील चामुंडी टेकडीवर हे चामुंडेश्वरी मंदिर आहे. चामुंडी देवीचे हे मंदिर असून येथे दुर्गा देवीची पूजा केली जाते.१२ व्या शतकात हे मंदिर उभारले गेले.

































































