
माझिया प्रियाला प्रीत कळेना यासोबतच बऱ्याच मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल दुसानिस ही आई झाली आहे. मृणालने स्वत: सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे.
View this post on Instagram
मृणालने 24 मार्च रोजी तिच्या मुलीला जन्म दिला. मृणाल व तिच्या पतीने मुलीचे नाव नुरवी ठेवले आहे. मृणालने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत त्यासोबत एक कॅप्शन शेअर केली आहे. ”पप्पांची लहान परी आणि मम्मीचं संपूर्ण जग… अशी आमची छोटीशी परिराणी या जगात आली आहे. तिचं नाव आहे नुरवी” (“Daddy’s little girl and mumma’s whole world ..!!! Our little princess has arrived..!! ? Nurvi .. 24.03.2022”, ) अशी कॅप्शन मृणालने शेअर केली आहे. मृणालच्या या पोस्टवर तिच्या सहकलाकारांनी व चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
























































