प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबत झाला ऑनलाईन फ्रॉड, अकाऊंटमधून काढले पैसे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शुभांगी अत्रे हिच्यासोबत ऑनलाईन फ्रॉड झाला असून तिच्या अकाऊंटमधून पैसे काढण्यात आले आहेत. या प्रकरणी शुभांगीने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल आहे.

शुभांगी अत्रे ही भाभीजी घर पे है या मालिकेतील अंगूरी भाभी म्हणून प्रसिद्ध आहे. तिची ही भूमिका चांगलीच गाजली आहे. ”मी 8 सप्टेंबरला एका प्रसिद्ध ऑनलाईन फॅशन अॅपवरून स्वत:साठी काही वस्तू मागवत होते. मी मला हवं ते ऑर्डर केलं आणि तत्काळ मला एक कॉल आला. त्यांनी माझ्या घराचा पत्ता पुन्हा एकदा कन्फर्म करून घेतला. माझी ऑर्डोर डिटेल मला दिली. त्यामुळे मला काहीच संशय आला नाही. सुरुवातीला दोन मुली माझ्यासोबत बोलत होत्या. त्यानंतर दोन मुलगेव बोलू लागले. त्यांनी मला माझ्या ऑर्डरसोबत फ्री गिफ्ट मिळणार असल्याचे मला सांगितले.माझ्या ऑर्डरशी संबंधित क़ॉल असल्याने मला संशय आला नाही. त्यांनी मला काही प्रोडक्ट सांगितले व त्यातलं एक ते मला गिफ्ट म्हणून देणार होते. मी मला जे हवं होतं ते त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला त्या प्रोडक्टचा जीएसटी भरायला सांगितला. ती अमाऊंट कमी असल्याने लगेच भरली मात्र ती भरताच माझ्या अकाऊंटमधून त्यापेक्षा अधिक पैसे काढले गेले. तेव्हा मला समजलं की माझ्यासोबत फ्रॉड झाला आहे. मी लगेचच माझे सर्व कार्ड ब्लॉक केले व सायबर सेलकडे तक्रार केली”, असे शुभांगीने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.