या मंदिरांमध्ये साजरी होती नागपंचमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

स्वातंत्र्यदिनाबरोबरच देशभरात नागपंचमीही मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. आपल्या देशात नागदेवतांची काही खास मंदिरं आहेत. या प्रत्येक मंदिराच एक वैशिष्ट आहे.

mannarshala-mandir-keral

मन्नारशाला मंदिर…केरळ
केरळमधलं मन्नारशाला मंदिर हे देशातल सर्वात मोठ व प्राचीन नाग मंदिर आहे. ३००० हजार वर्षापूर्वी हे मंदिर उभारलं गेलं. या मंदिरात सापाच्या ३०,००० मूर्ती व फोटो आहेत. नागपंचमीला या मंदिरात मोठा उत्सव असतो. नवपरिणीत जोडपी या मंदिरात नाग देवतांचे आशिर्वाद घेण्यासाठी येतात. तसेच अनेकजण अपत्यप्राप्तीसाठी नागदेवताला नवस करतात व तो पूर्णही होतो. अशी भाविकांची धारणा आहे.

bhuj-temple

भुजंग नाग, गुजरात
गुजरातमधील भुज येथे भुज किल्ला आहे. या किल्ल्यावर हे भुजंग नाग मंदिर आहे. नागदेवताच्या कुळातील शेवटच्या नागाला हे मंदिर समर्पित करण्यात आले आहे. दरवर्षी नागपंचमीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. यावेळी येथे जत्राही भरली जाते.

kuke-temple-3

कुके सुब्रमण्यम मंदिर, कर्नाटक
या मंदिरात नागांची देवता असलेल्या सुब्रमण्यम, वसुकी व शेषा ची पूजा अर्चा केली जाते. कुमारधारा नदीच्या सान्निध्यात उभारलेल्या या मंदिराच्या मागे असलेल्या पर्वतशिखरांच्या रांगा कुके मंदिराच सौंदर्य अधिकच खुलवतात.

sheshnag

शेषनाग मंदिर, जम्मू-कश्मीर
पुराणकथेनुसार शेषनागाला सापांचा राजा मानले जाते. पहलगाम येथील तळ्याची निर्मिती शेषनागाने केली असून आजही त्यांचा तिथे वास असतो असे मानले जाते. अमरनाथ यात्रे दरम्यान यात्रेकरू शेषनागाचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत.

nagnath

नागनाथ मंदिर, तामिळनाडू

तिरूनागेश्वरमधील नागनाथ स्वामी मंदिर हे प्रभु शंकराचे प्रसिद्ध मंदिर आहे. येथे केतूची पूजा केली जाते. त्याव्यतिरिक्त दक्क्षन, कारकोटाकन आणि शेष नागाचीही या मंदिरात पूजा केली जाते.

summary…famous-snakes-temples-in-india-