
सामना प्रतिनिधी । मुंबई
स्टार प्लस वाहिनीवरील ‘कानपुर वाले खुरानाज’ शोमध्ये नृत्यदिग्दर्शिका फराह खान शेजारणीच्या भूमिकेत दिसणार आहे. या शोच्या शूटिंगदरम्यान फराह खानच्या उजव्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे तिला आराम करायला सांगितले होते. तरीदेखील फराहने जखम झाली असतानादेखील ‘कानपुर वाले खुरानाज’चे शूटिंग केले. यापुढे ती जे काही शूट करणार आहे. ते ती एका जागेवर बसून करणार आहे. तिने काही एपिसोडचे चित्रीकरण पूर्ण केले. तिच्यामुळे चित्रीकरण थांबावे, असे तिला वाटत नाही. या शोमधून ती छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. या शोमध्ये रसिकांना खळखळून हसविताना दिसणार आहे. हा शो लवकरच सुरू होईल.




























































