परळीत शेतकऱ्याची विहरीत उडी घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एस एम पाटील। परळी वैद्यनाथ

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून मौजे तालुक्यातील नंदागौळ येथे एका शेतकऱ्याने विहरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. महादेव दत्तू गित्ते (२७) असे त्याचे नाव आहे.

महादेव अल्पभूधारक शेतकरी होता. सततची नापिकी व कर्जाचा डोंगर झाल्याने तो निराश झाला होता. पेरणीसाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते. यामुळे नंदागौळ शिवारातील विहरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, अपंग वडील, आई, भाऊ असा परिवार आहे. कमावता मुलगा गेल्यामुळे गित्ते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या आत्महत्येमुळे गावावर शोककळा पसरली आहे.