चंद्रपुरात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यात एका तरुण शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. सचिन अशोक येरगुडे (28) असं या शेतकऱ्याचं नाव आहे. अविवाहित असलेल्या सचिनवर आई-वडील आणि शेतीची जबाबदारी होती. मात्र, तो नापिकीमुळे वाढलेल्या कर्जाच्या चिंतेत होता. याच कर्जाच्या धास्तीने त्याने विषप्राशन करून आत्महत्या केली.