विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतकरी दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | वर्धा

वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातल्या टेंभरी परसोडी येथे शेतामधील गोठ्यात लाईट लावण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकरी
दाम्पत्याचा विजेच्या धक्याने दुर्दैवी मृत्यु झाला आहे. शेतात पडलेल्या जिवंत वीजेच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे दादाराव दोडके वय ३२ व त्यांच्या पत्नी शारदा दोडके वय २८ यांचा शेतातच मृत्यु झाला आहे.
टेंभरी परसोडी येथे शेतामध्ये घडलेल्या या घटनेमुळे पंचक्रोषीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दोडके दांपत्य नेहमी प्रमाणे शनिवारी दुपारी आपल्या शेतात गेले होते. शेतातील विहीरीवरील विघुतपेटीवरुन गोठ्यामध्ये जोडलेली तार पावसामुळे जमिनीवर पडली होती . मात्र त्यांना खाली पडलेल्या जिवंत विघुत तार न दिसल्याने या दोघांचा विद्युत तारेला स्पर्श झाला. त्यामुंळे वीजेच्या जोरदार धक्याने दोघांचाही जागीच मृत्यु झाला आहे . टेंभरी परसोडी या गावामध्ये या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. मृतक शेतकरी दांम्पत्याला मयुर आणि वेदांत अशी दोन लहान मुलं आहेत.
दरम्यान खरांगणा पोलिस ठाण्यात दोघांच्याही अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलिस करीत आहेत.