faशन paशन

556

ऋतुजा बागवे

आवडती फॅशन…साडी.

फॅशन म्हणजे…ज्यामध्ये आपल्याला कम्फर्टेबल वाटतं अशी.

व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालायला प्राधान्य देतेस?…इव्हेंटला जायचे असेल तर साडी आणि अन्य ठिकाणी जायचे असल्यास जीन्स-टी शर्ट, कुर्ता .

फॅशन म्हणजे केवळ कपडे की… नाही. त्याबरोबर आपले व्यक्तिमत्त्व तेवढेच महत्त्वाचे असते.

आवडती हेअरस्टाईल?…मोकळे केस.

फॅशन जुनी की नवी?…मला या दोन्हींचे कॉम्बिनेशन म्हणजे मिक्स मॅच करायला आवडते.

आवडता रंग?…काळा

तुझ्या जवळच्यांना तुझी कोणती फॅशन आवडते?…साडी. माझ्या साडय़ांचे कलेक्शन सगळ्यांना आवडते. शिवाय साडय़ांची निवड चांगली असल्याची दादही देतात.

स्ट्रीट शॉपिंग आवडते का?…हो, बार्गेनिंग करायलाही प्रचंड आवडतं. मी फारसे कपडे स्ट्रीटवर घेत नाही, पण बॅग, चपला, घडय़ाळं आणि ज्वेलरी खूप घेते. कुलाबा कॉजवेला मी जेव्हा पण जाते तेव्हा मी ज्वेलरी घेते. तिथे ज्वेलरीला फार ऑप्शन असतात. इंडियन, इंडोवेस्टर्न, ऑक्सडाईज, डायमंड अशी सगळ्या प्रकारची ज्वेलरी मिळते. एकाच ठिकाणी व्हरायटी मिळत असल्याने जास्त फिरायला लागत नाही, ऑप्शन असतात.

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करतेस?…बॅग.

ज्वेलरीमध्ये काय आवडते?…अंगठी, झुमके.

आवडता ब्रॅण्ड…मला जे आवडतं, जे छान वाटतं आणि जे मनाला पटतं ते घेते.

फॅशन फॉलो कशी करतेस? ः मी फार फॅशन कॉन्शस नाही. अभिनेत्रींच्या पोस्ट पाहत असते. रंगसंगतीची फार आवड असल्याने मी वेगवेगळे रंग बघत असते, निरीक्षण करत असते, पण मला वाटतं, कपडय़ांपेक्षा आपलं व्यक्तिमत्त्व जास्त छाप पाडते.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी…माझी बहीण मला अपडेट ठेवत असते. तिला फॅशनबाबत कळतं. त्यामुळे शॉपिंगसाठी मला तीच लागते.

ब्युटी सीक्रेट…मला वाटतं आठ तासांची छान झोप, खूप पाणी, योग्य व्यायाम आणि उत्तम डाएट. त्याचबरोबर आपण आतून आनंदी राहिलो तर आपल्या चेहऱयावर तेज येतं. ते लोकांना जास्त अपील करतं.

टॅटू काढायला आवडेल का?…अजिबात नाही. एकतर गोंदवून वगैरे घ्यायची फार भीती वाटते. मला त्यात फार काही आकर्षण वाटत नाही. तो एकदा काढला की, कायमस्वरूपी राहतो. देवाने इतकं छान शरीर दिलंय, त्यावर का प्रयोग करत बसावं!

तुझ्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी…पर्फ्यूम, लिपस्टिक आणि काजळ पेन्सिल.

फिटनेससाठी…दोन-दोन तासांनी खा. रात्री आठनंतर हलका आहार घ्या. सगळं खा. फक्त खाण्यावर नियंत्रण असू द्या.

आपली प्रतिक्रिया द्या