चार चिमुकल्यांना विहिरीत ढकलून वडिलांनीही उचलले टोकाचे पाऊल, बुलढाणा जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भाले अंजन गावात एका विहिरीत पाच मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. कौटुंबिक कारणावरून चार चिमुकल्यांना विहिरीत ढकलून वडिलांनीही आत्महत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. शवविच्छेदनानंतर सर्व मृतदेह नातलगांच्या हवाली करण्यात आले.

विजय किराडिया (35) यांचा शनिवारी पत्नीशी वाद झाला होता. वाद झाल्यानंतर त्यांची पत्नी इस्लामपूर येथे माहेरी निघून गेली. रविवारी सकाळी विजय यांनी मुलांना चहा करून दिला. घरातील कामे करत असताना विजय यांच्या वडिलांनी पत्नीबद्दल विचारले. यामुळे संतापलेल्या विजय यांनी चारही मुलांना घेऊन धरण परिसरातील शेतातील विहिरीत अगोदर प्रीत (7) आणि पीयूष (2) प्राची (5) आणि पूर्वी (4) यांना विहिरीत ढकलले. चिमुकल्यांना विहिरीत ढकलल्यानंतर विजय यांनी स्वतः गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दोरी तुटल्याने तेही विहिरीत कोसळले.