वाहन अपघातात बाप लेकीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोटारसायकलची ट्रकला धडक बसल्याने झालेल्या अपघातात बाप लेकीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रफी उल्ला चौधरी आणि सोहेना चौधरी अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी कुरार पोलिसांनी ट्रकचालकाला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

रफीउला हे कुरार येथे पत्नी आणि मुलासोबत राहत होते. सात महिन्यापूर्वी रफिउल्लाच्या पत्नीचे ऑपरेशन झाल्याने त्यांची नातेवाईक ताहिरा चौधरी या त्याच्याकडे राहण्यास आल्या होत्या. रविवारी दुपारी रफीउला, ताहिरा, सोहेना, तेहनूर हे मोटारसायकलवरून माहीम दर्गा येथे जात होते. तेव्हा पठाणवाडी ब्रीजवर एक ट्रक उभा होता. रफिउल्लाची मोटारसायकल त्या ट्रकला जाऊन धडकली. धडकेमुळे ते खाली पडले. अपघातात रफिउल्ला आणि सोहेनाला गंभीर दुखापत झाली. तर ताहिरा आणि तेहनूर ला किरकोळ इजा झाली. पोलिसांनी रफिउल्ला आणि सोहेनाला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी रफिउल्ला आणि सोहेनालामृत घोषित केले.