मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याला सात कोटींचा दंड

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । ब्रिस्बेन

स्वत:च्या मुलीवर तब्बल दहा वर्ष बलात्कार करणाऱ्या पित्याला न्यायालयाने सात कोटींचा दंड ठोठावला आहे. तसेच त्या पित्याला आजन्म कारावासाची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरात 1970 साली ही घटना घडली आहे.

ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बने शहरात राहणाऱ्या त्या नराधम पित्याने त्याची मुलगी पाच वर्षांची असताना तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला होता. त्यानंतर तब्बल दहा वर्ष तो तिच्यावर बलात्कार करत होता. तसेच याबाबत कुणालाही सांगितल्यास मुलीला व तिच्या आईला जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती. त्यामुळे मुलीने याबाबत कुणालाही सांगितले नव्हते. मात्र 2010 मध्ये या मुलीने तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तब्बल नऊ वर्ष लढा दिल्यानंतर न्यायालयाने पित्याला मुलीला सात कोटी रुपये देण्याचे आदेश दिले असून त्याला आजन्म कारावासाची शिक्षाही ठोठावली आहे.