फिफा विश्वचषकात मोठा उलटफेर, गतविजेत्या जर्मनीला मेक्सिकोचा दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

फिफा विश्वचषकामध्ये रविवारी मोठी उलटफेर झाला. गतविजेत्या जर्मनीला मेक्सिकोच्या संघाने पराभूत करत विश्वचषकाची दणक्यात सुरुवात केली. रविवारी सायंकाळी झालेल्या या सामन्यात मेक्सिकोने जर्मनीचा १-० असा पराभव केला. मेक्सिकोकडून लोझानोने ३५ व्या मिनिटाला निर्णायक गोल केला.

गतविजेत्या जर्मनीने पहिला गोल खाल्ल्यानंतर सातत्याने मेक्सिकोच्या गोलपोस्टवर हल्ले केले, परंतु त्यांना यश आले नाही. दोन-तीन वेळा अगदी सोप्या संधीने त्यांना दवडल्या. भक्कम बचाव आणि गोलरक्षकाच्या दमदार कामगिरीच्या जोरावर मेक्सिकोने जर्मनीला पार रडकुंडी आणले. जर्मनीने शेवटपर्यंत गोल करण्याचा प्रयत्न केला, पण मेक्सिकोने त्यांचे प्रत्येक प्रयत्न हाणून पाडले.

फिफा क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या जर्मनी आणि १५ व्या स्थानावर असलेला मेक्सिकोचा संघ १२ वेळा आमने-सामने आला आहे. यात जर्मनीने ५ वेळा तर मेक्सिकोने दोन वेळा विजय मिळवला आहे, तर ५ सामने अनिर्णित राहिले आहेत. या १२ सामन्यात जर्मनीने २४ गोल, तर मेक्सिकोने ११ गोल केले आहेत.