जपानचा विजयाने श्रीगणेशा, कोलंबियाचा धक्कादायक पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मॉस्को

२१व्या फिफा विश्वचषकामध्ये आशियायी संघ जपानने विजयाने सुरुवात केली आहे. मंगळवारी सायंकाळी झालेल्या सलामीच्या सामन्यात जपानने कोलंबियाचा २-१ अशा गोल फरकाने धक्कादायक पराभव केला. जपानकडून कागावा याने सहाव्या आणि ओसाकोने ७३ व्या मिनिटाला गोल केला, तर कोलंबियाकडून क्विंटेरोने ३९ व्या मिनिटाला गोल केला.

जागतिक फुटबॉल क्रमवारीमध्ये जपान ६१ व्या स्थानावर आहे तर कोलंबियाचा संघ १६ व्या स्थानावर आहे. परंतु मंगळवारी झालेल्या सामन्यात जपानचा संघच वरचढ ठरला. सामन्याच्या सुरुवातीला कोलंबियाला धक्का बसला. जपानच्या खेळाडूला गोल बॉक्समध्ये चुकीच्या पद्धतीने पाडल्यामुळे कोलंबियाचा खेळाडू सांचेज याला पंचांनी रेड कार्ड देत बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे कोलंबियाला संपूर्ण सामना दहा खेळाडूंसह खेळावा लागला. पंचांनी जपानला पेनल्टी कॉर्नर दिला. यावर गोल करत कागावा याने जपानला १-० आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जपानला आणखी एक सुवर्णसंधी मिळाली परंतु त्याचे गोलमध्ये रुपांतर होऊ शकले नाही. कोलंबियानेही दहा खेळाडूंसह आक्रमक खेळ केला आणि ३९ व्या मिनिटाला गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणली. मध्यांतरापर्यंत सामना बरोबरीत होता.

विश्वचषकासाठी ५ हजार किमीची सायकल सफर

मध्यांतरानंतर चौथ्यांच मिनिटाला जपानला कॉर्नर मिळाला परंतु कोलंबियाच्या खेळाडूंनी हे आक्रमण थोपवून घरले. त्यानंतर ओसाकोने ७३ व्या मिनिटाला गोल करत जपानची आघाडी २-१ अशी केली. जपानने शेवटपर्यंत ही आघाडी कायम ठेवली आणि सामन्यावर विजयी मोहोर उमटवली.

फुटबॉल विश्वचषकाच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा