…पण बेल्जियम जिंकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेवटच्या मिनिटापर्यंत सामना बरोबरीत सोडविण्यासाठी संघर्ष करणारा कॅनडा बेल्जियमला नडला, भिडला. कॅनडाला अनेकदा संधी मिळाली, पण ते त्याचे गोल करू शकले नाही. गोल करण्यासाठी मिळालेली पेनल्टीसुद्धा अल्फान्सो डेव्हिसने गमावली. जागतिक क्रमवारीत दुसऱया क्रमांकावर असलेल्या बेल्जियमला आज धक्का बसणार होता, पण तो टाळला गेला आणि मिची बात्शुआईने 45 व्या मिनिटाला केलेल्या एका गोलने बेल्जियमची लाज राखली. त्यामुळे बेल्जियम ‘एफ’ गटातला आजच्या लढतीत विजयासाठी पात्र नसला तरी तेच जिंकले आणि त्यांनी वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यात सलग आठव्या विजयाची नोंद केली.

आजचा सामना खऱया अर्थाने कॅनडाच्या बाजूने असायला हवा होता, पण हा संघ आपल्या प्रयत्नांना गोलाचा आकार देण्यासाठी वारंवार अपयशी ठरला. सामन्याच्या 23 व्या मिनिटालाच कॅनडाच्या खात्यात गोलाची नोंद व्हायला हवी होती. चेंडू बेल्जियमच्या खेळाडूच्या हातात लागला आणि अल्फान्सो डेव्हिसला पेनल्टी मिळाली, पण त्याची ती पेनल्टी गोलरक्षक थिबू कोर्तवाने रोखली. एवढेच नव्हे तर ऑलिस्टर जॉनस्टनचे गोलचे प्रयत्नही त्याने यशस्वी होऊ दिले नाही.