भाजपच्या विनोद शेलारांविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रामनवमीच्या निमित्ताने काढलेल्या शोभा यात्रेदरम्यान अजान सुरू असतानाच मालवणी येथील मशिदीसमोर वाद्य वाजवण्यास चिथावणी दिल्याप्रकरणी भाजपचे विनोद शेलार, युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर तिवानाविरोधात मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुह्यात पोलिसांनी अजून कोणालाही अटक केलेली नाही.

रामनवमीनिमित्त मालवणी येथे बजरंग दलाच्या माध्यमातून शोभायात्रा काढली जाते. ढोल-ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढली जाते. रविवारी रात्री शोभायात्रा मालवणीच्या गेट क्रमांक 7 येथे आली. तेव्हा जामा मशीद येथे अजान सुरू होती. अजान सुरू असल्याने पोलिसांनी वाद्य वाजवणे बंद करण्यास सांगितले. तेव्हा तेजिंदर सिंग आणि विनोद शेलार याने बजाओ रे बजाओ असे स्पीकरवर घोषणा करून मोठय़ा आवाजात गाणी लावण्यासाठी चिथावणी दिली. त्या शोभायात्रेत असलेल्या विनोद शेलार, तेजिंदर तिवाना आणि 25 जणांविरोधात मालवणी पोलिसांनी कलम 153, 153 अ, 141, 142, 149 188 भादंवि कलम 37 (3) नुसार गुन्हा नोंद केला आहे.