
सामना प्रतिनिधी । मुंबई
महिला गटात मुंबई पोलीस व शिवशक्ती यांनी जबरदस्त खेळ करीत प्रतिस्पर्ध्यांना हरवले आणि शिवनेरी सेवा मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात मुंबई पोलीसच्या संघाने जिजामाता या बलाढ्य संघाचा निसटता पराभव करून अंतिम फेरी गाठली. मुंबई पोलीस संघाने ही लढत 41-28 अशा फरकाने जिंकली. मध्यांतराला जिजामाताच्या संघाने 18-15 अशी 3 गुणांची आघाडी घेतली होती, मात्र उत्तरार्धात मुंबई पोलीसच्या महिलांनी खेळ उंचावत बाजी पलटवली आणि सामना जिंकला. मुंबई पोलिसतर्फे सिद्धी वाफेलकर हिने एकटीने 12 गुण मिळवले. भक्ती इंदुलकर हिने तिला 8 गुण मिळवत उत्तम साथ दिली. दुसर्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शिवशक्ती संघाने अमर हिंद मंडळ या संघाचा 49-22 असा पराभव केला.



























































