
सामना ऑनलाईन । मुंबई
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतल्या एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहिता पथकातील अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
FIR registered against Congress candidate from South Mumbai Milind Deora under section 171 of IPC ( giving false statements for elections) and section 125 of the presentation of people’s act ( promoting enmity between classes in connection with elections). (file pic) pic.twitter.com/vlGe3433kA
— ANI (@ANI) April 21, 2019
देवरा यांच्या विरोधात काही दिवसांपुर्वी मतदारांना चुकीची माहिती देऊन आचारसंहितेचा भंग केला असल्याची तक्रार उच्च न्यायालयाचे वकील ऍड. धर्मेंद्र मिश्रा यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. जैन समाजातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी चुकीची माहिती पसरवून शिवसेनेची बदनामी करत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त अश्विनी कुमार यांच्याकडे ऍड. मिश्रा यांनी तक्रार केली होती.
























































