कांदिवलीत 15 मजली इमारतीला आग; दोघे जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांदिवलीत रात्री 8 च्या सुमाराला 15 मजली इमारतीला आग लागल्याने दोघे जखमी झाले. अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रणाचे काम सुरू आहे. दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर आणि उपमहापौर सुहास वाडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. कांदिवली पश्चिमेतील हंसा हेरिटेज या 15 मजली इमारतीला रात्री 8 च्या सुमाराला आग लागली. मथुरादास मार्गावरील लिज्जत पापडच्या कार्यालयाजवळ ही इमारत असून 14 व्या मजल्यावर ही आग लागली. त्यात जखमी झालेल्या दोघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची नावे अजून समजू शकलेली नाहीत. अग्निशमन दलाचे 4 बंब, 3 जेट टँक, 1 वॉटर टँकरच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.