
पुणे शहरातील पाषाण रस्त्यावरील भारतीय विज्ञान शिक्षा व अनुसंधान संस्थेच्या (Indian Institute of Science Education and Research) आवारातील इमारतीत असलेल्या प्रयोगशाळेत शुक्रवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेउन तासाभरात आग आटोक्यात आणली. आग लागल्यानंतर प्रयोगशाळेतील कर्मचारी तातडीने बाहेर पडल्याने गंभीर दुर्घटना टळली आहे.
आयसर संस्थेच्या एका इमारतीतील प्रयोगशाळेतून दुपारी सव्वाबाराच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर धूर येत होता. याबाबतची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमक दलाचे जवान पाण्याचे चार बंब आणि टँकर घेउन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, गजानन पाथ्रुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.
Maharashtra: Fire breaks out inside Indian Institute of Science Education and Research, Pune. Four fire tenders have been rushed to the spot. Details awaited.
— ANI (@ANI) July 16, 2021
“>
आगीत प्रयोगशाळेतील साहित्याचे नुकसान झाले आहे. आग लागल्यानंतर प्रयोगशाळेतील कर्मचारी तातडीने बाहेर पळल्याने गंभीर दुर्घटना टळली. आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी दिली.
आग आटोक्यात आल्यानंतरही सुरक्षेचा उपाय म्हणून अग्निशमन दलाचा बंब आणि जवान तेथे थांबले होते. आग पूर्णपणे आटोक्यात आल्याची खात्री पटल्यानंतर अग्निशमक दलाचे जवान संस्थेच्या आवारातून बाहेर पडले.
































































