आगीचा सामना करण्यासाठी रुग्णालये मॉलमध्ये मॉक ड्रिल, अग्निशमन दलाची मुंबईत मोहीम

fire-brigade-mock-drill

मुंबईत आग, गॅसगळतीच्या दुर्घटनांमध्ये तातडीने बचावकार्य करता यावे, जीवित-वित्तहानी टळावी यासाठी पालिकेच्या अग्निशमन दलाकडून संपूर्ण मुंबईत ‘मॉक ड्रील’ घेण्यात येत आहे. यामध्ये रुग्णालये, मॉलसह रहिवासी इमारतींमध्ये रहिवासी, कामगार आणि नागरिकांना अशा दुर्घटनांप्रसंगी कोणती काळजी घ्यावी, प्राथमिक टप्प्यात कोणत्या उपाययोजना, बचावकार्य करावे याचे प्रशिक्षण दिले जात आहे.

झपाटय़ाने विकसित होणाऱया आणि दाटीवाटीच्या मुंबईत आगीसारखी दुर्घटना घडल्यास अनेक वेळा बचावकार्य सुरू होण्यापर्यंत काही वेळा जातो. त्यामुळे जीवित-वित्तहानी वाढण्याचा धोका असतो. अशा दुर्घटनांमध्ये कोणती काळजी घ्यावी याबाबत स्थानिक रहिवाशांना माहिती नसल्याने दुर्घटनेची तीव्रता वाढत जाते. त्यामुळे मुंबईकरांना अशा आपत्तींच्या वेळी कोणती काळजी घ्यावी याचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती उपमुख्य अग्निशमन दल अधिकारी हेमंत परब यांनी दिली. प्रमुख अग्निशमन दल अधिकारी पैलास हिवराळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये मॉल, सोसायटय़ा, रुग्णालयांमध्ये ही मोहीम राबवण्यास सुरुवातही करण्यात आली आहे.

बचावकार्याचा वेग वाढणार

दुर्घटनेप्रसंगी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याचे प्रशिक्षण देण्यासाठी अग्निशमन दलाने खास टीम तयार केल्या आहेत. या टीमच्या माध्यमातून नागरिकांना दुर्घटना घडल्यानंतर का@ल पुठे करावा, आगीच्या घटनेत धुराचे लोळांपासून स्वतःचा बचाव कसा करावा, एक्सटिंग्युचरचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण दिले जात आहे. दरम्यान, अलीकडेच लालबाग गॅसगळतीच्या दुर्घटनेत दहा जण तर भंडारा रुग्णालयाच्या आगीत दहा चिमुकल्यांचा बळी गेल्यामुळे पालिकेच्या अग्निशमन दलाकडून देण्यात येणारे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या