
सावेडी उपनगरातील नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या कोहिनूर मॉल परिसरातील एका मोठ्या व्यापारी संकुलाला आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझवण्याचे काम सुरू आहे. आग कशामुळे लागली हे अजून समजले नसल्याचे महापालिकेचे अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळ यांनी सांगितले.
आज सकाळी दहाच्या सुमाराला ही आग लागल्या असून आग मोजण्यासाठी महानगरपालिकेसह भिंगार तसेच कॅन्टोन्मेंट व अन्य काही ठिकाणचे अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आग वजनाचे काम सुरू आहे नेमकी आग कशामुळे लागली याची अद्याप माहिती मिळू शकली नाही

























































