मुंबईत सर्व्हिस सेंटरला भीषण आग, 6 मर्सिडीज जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईमध्ये सर्व्हिस सेंटरला लागलेल्या भीषण आगीमध्ये कोट्यवधींच्या 6 मर्सिडीज गाड्या जळून खाक झाल्या आहेत. महालक्ष्मी रेल्वेस्थानकाजवळील पुलाखाली असणाऱ्या दोन सर्व्हिस सेंटरमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

बुधवारी रात्री एकच्या सुमारास हालक्ष्मी रेल्वेस्थानकाजवळील पुलाखाली असणाऱ्या दोन सर्व्हिस सेंटरमध्ये आग लागली. यात सहा गाड्या खाक झाल्या. ही आग लागल्यानंतर रेल्वेस्थानक परिसरातील ओव्हरहेड वायरचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. सुदैवाना यात कोणताही जीवितहानी झाली नाही.

…तर रेल्वेस्थानकावर आग पसरली असती
दरम्यान, आगीची माहिती मिळता अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आगीने रौद्र रूप धारण केले होते. अग्निशमन दलाने अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात अपयश आले असते तर ही आग महालक्ष्मी रेल्वेस्थानकावर पसरण्याचा धोका होता.