
सामना प्रतिनिधी । पुणे
राष्ट्रवादी काँगेसचे नेते अजित पवार यांच्या मुळशी तालुक्यातील घोटावडे येथील फार्महाऊसला भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. ही आग इतकी मोठी होती की त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होता. त्यामुळे या आगीत मोठी वित्तहानी झाल्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. रविवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. सध्या आग आटोक्यात आल्याचे सूत्रांकडून कळते.
रविवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या फार्महाऊसला आग लागली. आग इतकी मोठी होती की त्यामुळे काळ्या धुराचे ढग परिसरात पसरले होते. आगीची तीक्रता लक्षात घेता स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर आग विझवण्यासाठी दोन बंब घटनास्थळी दाखल झाले, मात्र या आगीचे नेमके कारण अद्यापि कळू शकलेले नाही.





























































