
सामना ऑनलाईन । मुंबई
अंधेरीतील कदमनगर भागातील एसआरए इमारतीतील १० व्या आणि ११ व्या मजल्यावर साडे आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून या आगीत चारपैकी तिघांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे, तर एकाचा शोध सुरू आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
सविस्तर वृत्त लवकरच


























































