चंद्रपूरात गृहोपयोगी वस्तूंच्या दुकनाला आग; बाजारातील वस्तू जळून खाक

482

चंद्रपूर शहरातील गजबजलेला परिसर असलेल्या संत अन्द्रिया देवालयाजवळच्या झी बाजार या गृहोपयोगी सेलच्या दुकानाला सोमवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत बाजारातील वस्तू जळून खाक झाल्या आहेत. पहाटे 3.15 वाजता अग्निशमन दलाला याबाबत कळवण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीचे नेमके कारण समजले नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळपर्यंत अग्निशमन दलाचे 25 बंब आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना आग विझवण्यात यश आले. शहराच्या मध्यभागी असलेला गृहोपयोगी छोट्या वस्तूंचा हा बाजार नेहमी गजबजलेला असतो. रात्रीच्यावेळी आग लागल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. सुमारे 30 वर्षांपासून बाजार सुरू आहे. आगीत सुमारे साडेतीन कोटींचा माल आगीत भस्मसात झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. आग लागली त्यावेळी इमारतीत 30 कर्मचारी होते. ते सर्व सुखरूप आहेत. इमारतीतून धूर निघत असल्याचे सुरक्षा रक्षाकच्या लक्षात येताच त्यांनी कर्मचाऱ्यांना झोपेतून उठवले. त्यामुळं जीवितहानी टळली आहे. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांमुळे आग विझवण्यात आली आहे. आगीमागचे नेमके कारण समजले नसले तरी ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या