परळीत बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमला आग

773

परळीत महाराष्ट्र बॅकेच्या बाजुलाच असलेल्या एटीएममध्ये शॉटसर्किट होऊन एटिएम मशिनला आग लागली. या आगीत एटीएम मशिन जळून खाक झाले आहे. ही घटना शनिवारी  सकाळी 6.30 च्या सुमारास घडली. आग वेळेतच विझवल्याने मोठी हानी टळली आहे. आगीच्या घटनांमधून नगर परिषद कुठलाच धडा घेताना दिसत नाही.

एटीएममधील आगीची माहिती समजताच अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाल्याने ही आग आटोक्यात आणले गेल्याचे समजते. अग्निशामक बंब जर वेळेवर उपलब्ध झाला नसता तर आजुबाजुला ही आग पसरुन मोठा अनर्थ घडला असता. कुठलीही मोठी घटना होण्यापूर्वी परळी नगर परिषदेने शहरातील शासकीय कार्यालय, सिनेमागृह, शाळा, कॉलेज, दवाखाना, मंगल कार्यालय यांचे अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करुन घेणे गरजेचे झाले आहे. मागील वर्षी स्टेशन रोडवर लागलेल्या आगीत 6 दुकाने जळून खाक झाले होते,मात्र अशा घटनांकडे नगर पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या