पुणे – रुबी हॉलजवळील इमारतीच्या ११ मजल्यावर आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

पुण्यातील वानवडी येथील रुबी हॉल क्लिनीक शेजारील इमारतीच्या ११ व्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. आगीमुळे आकाशात धुराचे लोट उठल्याचे दिसत आहे. आगीबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग नक्की कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.