परळीत जुन्या वाड्याला आग; कडबा जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। परळी वैजनाथ

शहरातील गणेशपार जवळ असलेल्या देशमुख गल्लीतील डॉ.सुरेश चौधरी यांच्या जुन्या वाड्यास बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास अचानक आग लागली. ही आग इतकी भयानक होती की या आगीत वाड्यातील सर्व कडबा जागीच जळून खाक झाला. या वेळी आग लागल्याचे समजताच नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वाड्यात बांधलेल्या दोन बैलांपैकी एकाला वाचवण्यात यश आले तर दुसरा बैल आगीत होरपळला आहे. अग्निशामक दलाने आग नियंत्रणात आणल्याने मोठी हानी टळली आहे. या आगीत वाड्यातील सर्व कडबा जळून खाक झाला आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. वाड्यात कोणीच राहत नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.