
जयपूरच्या विश्वकर्मामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एका घराला भीषण आग लागून पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या आगीत तीन लहान मुलांसह दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. आगीचे नेमके कारण समजलेले नाही.
जयपूरच्या विश्वकर्मा येथील जैसल्या गावात मधुबनी बिहारमधील एक कुटुंब भाड्याने राहत होते. मध्यरात्री सर्व झोपले असताना त्यांचा घरात अचानक आग लागली. आग इतकी पसरली होती की कोणालाच बाहेर येण्याचा मार्ग सापडला नाही. आगीपासून वाचण्यासाठी पाचही जण एका कोपऱ्यात उभे होते दरम्यान त्या आगीत संपूर्ण कुटुंब होरपळले. शेजाऱ्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला फोन करुन माहिती दिली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत एकाचा मृत्यू झाला होता.
अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जळलेले मृतदेह बाहेर काढले. शवविच्छेदनासाठी मृतदेह एसएमएस रुग्णालयात नेण्यात आले आहे. आग नेमकी कशाने लागली याबाबत तपास सुरु आहे.
























































