आप आमदाराच्या ताफ्यावर गोळीबार, एकाचा मृत्यू

748

दिल्ली विधानसभा निवडणूकीत 62 जागा मिळवत दणदणीत विजय मिळवला. या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच आपचे आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे तर एक कार्यकर्ता जखमी झााल आहे.

मेहरुली मतदारसंघातून निवडणूक जिंकणारे नरेश यादव हे विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यासोबत मंदिरात गेले होते. तेथून ते घरी परतत असताना त्यांच्य़ा ताफ्यावर गोळीबार झाला. या गोळीबारात आपच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. नरेश यादव यांनी हा हल्ला दुर्देवी असून पोलिसांनी याचा योग्य तपास करावा अशी मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

शनिवारी दिल्लीत पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीचा मंगळवारी निकाल लागला. अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने 62 जागा जिंकल्या तर भाजपला 8 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला तर भोपळाही फोडता आला नाही. भाजपने या निवडणुकीतील सामना देशभक्त विरुद्ध देशद्रोही असाच रंगवला होता. त्यामुळे विजयाचा जल्लोष करताना केजरीवाल यांनी ‘हा तर भारतमातेचा विजय आहे’ अशी खणखणीत प्रतिक्रिया देत भाजपला सणसणीत चपराक हाणली.

आपली प्रतिक्रिया द्या