रशियात शाळेमध्ये रक्तरंजित थरार; गोळीबारात 8 विद्यार्थ्यांसह 13 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण जग कोरोना विषाणूशी लढत असताना मंगळवारी रशियाच्या कझान शहरातील शाळेत रक्तरंजित थरार घडला. हल्लेखोरांनी शाळेत घुसून मुलांना ओलिस धरले आणि अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 8 विद्यार्थी आणि एका शिक्षकासह 13 जणांचा मृत्यू झाला. सुरक्षा दलांनी वेळीच हल्लेखोरांना घेरून त्यातील दोघांना गोळ्या झाडून ठार केले. हल्ल्यामागील कारण अजून उघड झालेले नाही.

हल्ल्यानंतर दोघा विद्यार्थ्यांनी शाळेच्या तिसऱया मजल्यावरील खिडकीतून उडी घेतली. उंचावरून खाली पडून त्या दोघा मुलांचा मृत्यू झाला, अशी माहिती आपत्कालीन सेवेच्या प्रवक्त्यांनी दिली.