कोस्टल रोडवर पहिला अपघात

कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये आज कार भिंतीला धडकल्याने अपघात झाला. अपघातात गाडीतील दोघांही प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातामुळे काही काळ बोगद्यातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

कोस्टल रोड वरळी ते मरीन ड्राईव्ह ही मार्गिका सुरू झाल्यापासून हा या मार्गावरील पहिला अपघात आहे. कोस्टल रोडवर मरीन ड्राईव्ह दरम्यान दुपारी साडेबाराच्या सुमाराला काळ्या रंगाची गाडी बोगद्यातील भिंतीला धडकली. गाडीतील तांत्रिक अडचणीमुळे नियंत्रण सुटून ही गाडी भिंतीवर धडकली.