
आपल्या देशात आजही सेक्स किंवा त्या संबंधित गोष्टींबाबत फारशी जागरुकता नाही. अनेकजण तर या विषयांबाबत बोलायलाही लाजतात. मात्र हल्ली चित्रपट, वेबसिरीजमधून या विषयांना थेट हात घातला जात आहे. सेक्स टॉय बाबतही यातून दाखवले जातेय. मात्र तरिही आतापर्यंत देशात कुठेही अधिकृतरित्या सेक्स टॉयची विक्री होत नव्हती.
देशात आजही अर्ध्याहून अधिक लोकांना सेक्स टॉयबाबत माहित नसेल त्यामुळे ते विकत घ्यायची गोष्ट तर दूरच राहिली. मात्र अशा आपल्या देशात आता पहिले अधिकृत सेक्स टॉयचे दुकान सुरू झाले आहे. हे दुकान देशातील सर्वात हॅपनिंग राज्य असलेल्या गोव्यात सुरू करण्यात आले आहे.
‘कामा गिझमोस’ असे त्या दुकानाचे नाव आहे. हे दुकान सेक्स टॉय विकणाऱ्या कामाकार्ट व गिझोमोसवाला या दोन रिटेल कंपन्यांनी मिळून सुरू केले आहे. हे दुकान गोव्यातील कलंगुट भागात आहे. या दुकानात तुम्हाला विविध प्रकारचे कंडोम्स, जेल, वायब्रेटर, पंप इत्यादी प्रकारच्या वस्तू मिळतील.




























































