क्रिकेटच्या वादातून तरूणाला बॅटने मारहाण, पाच जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेट खेळत असताना किरकोळ वादाच्या रागातून टोळक्याने तरूणाला बॅटने मारहाण केल्याची घटना आंंबेगाव बुद्रूकमध्ये घडली. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

अक्षय अशोक पवार (वय 23) , केतन प्रदीप ढमाळ (वय 21) , अभय सुरेश डोंबे (वय 21) , सुयश नितीन शिळीमकर (वय 21 ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. साहिल दांगट (वय 19,रा. आंबेगाव बुद्रूक ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अक्षय आणि साहिल क्रिकेट खेळत होते. त्यावेळी दोघांची शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचा राग आल्यामुळे अक्षयने इतर साथीदारांना बोलावून साहिलला बॅटने मारहाण केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड तपास करीत आहेत.