‘टायटॅनिक’ पाहायला गेलेल्या पाणबुडीतील सगळ्यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीतील पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. समुद्रात खोलवर गेलेल्या या पाणबुडीचा संपर्क तुटला होता आणि त्यानंतर यातील ऑक्सिजनही संपला होता. खोल पाण्यात गेल्यामुळे पाण्याच्या दबावामुळे या पाणबुडीचा स्फोट झाला असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्टॉकटन रश, हमिश हार्डींग्ज, पॉल हेन्री नारजिओलेट, शहजादा दाऊद आणि त्याचा मुलगा सुलेमान या पाच जणांचा एक ग्रुप होता ज्याने स्वत:ला ‘ट्रू एक्सप्लोरर्स’ असं नाव ठेवलं होतं. नवनवीन गोष्टींचा शोध घेण्याची या समूहाची इच्छा होती आणि त्यासाठी म्हणून हे पाच जण सबमरीनमधून टायटॅनिक पाहण्यासाठी जात होते.

या मोहिमेत सहभागी झालेल्या हमिश हार्डींग्जच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूबद्दल खेद व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “आपल्या कुटुंबासाठी, आणि आपल्या व्यवसायासाठी आणि नव्या आव्हानांसाठी जगलेल्या आणि मुलांवर प्रेम करणाऱ्या पित्याला श्रद्धांजली” अशा शब्दात त्याच्या कुटुंबियांनी शोक व्यक्त केला आहे. द सन या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. शहजादा आणि सुलेमान यांच्या कुटुंबानेही त्यांना श्रद्धांजली वाहिली असून त्यांनी म्हटले आहे की, “शहजादा आणि सुलेमान दाऊद यांच्या मृत्यूबाबात कळवताना आम्हाला प्रचंड दु:ख होत आहे. आमचा लाडका मुलगा ओशनगेटच्या सबमरीनमध्ये होता जी पाण्यात नाहीशी झाली. या दुखाच्या क्षणी या दोघांची आपल्या प्रार्थनांमध्ये आठवण ठेवा. शोधमोहिमेत सामील झालेल्या सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत. या कठीण काळात शोध मोहिमेचे अथक प्रयत्न आमच्यासाठी आशेचा किरण बनले होते.”

लोकांना घेऊन जाणारी टायटन पाणबुडी रविवारी दुपारपासून बेपत्ता झाली होती. गुरुवारी सकाळपर्यंत पाणबुडीचा ऑक्सिजन संपण्याची भीती व्यक्त केली जात होती. पाणबुडी शोधण्यासाठी यूएस आणि कॅनडातील 3 सी-130 हरक्यूलिस विमाने पाण्याखालील रोबोटसह पाठवण्यात आली होती याशिवाय एक झ्-8 विमान आणि 2 कॅनेडियन सरफेस जहाजेदेखील शोध मोहिमेत सहभागी झाले होते.

लोकांना घेऊन जाणारी टायटन पाणबुडी रविवारी दुपारपासून बेपत्ता झाली होती. गुरुवारी सकाळपर्यंत पाणबुडीचा ऑक्सिजन संपण्याची भीती व्यक्त केली जात होती. पाणबुडी शोधण्यासाठी यूएस आणि कॅनडातील 3 सी-130 हरक्यूलिस विमाने पाण्याखालील रोबोटसह पाठवण्यात आली होती याशिवाय एक झ्-8 विमान आणि 2 कॅनेडियन सरफेस जहाजेदेखील शोध मोहिमेत सहभागी झाले होते.

टायटॅनिक या जहाजाबद्दलचे आकर्षण आणि उत्सुकता आजही सर्वांना आहे. या घटनेवर आधारित टायटॅनिक हा हॉलिवूडपटही खूप लोकप्रिय आहे. टायटॅनिक हे त्या काळातलं सर्वात आधुनिक आणि मोठं जहाज होतं, जे अॅटलांटीक महासागरात बुडालं. पाण्याखाली तब्बल 3800 मीटर खोल हे जहाज आहे असे सांगितले जाते. हे जहाज बुडालं असलं तरी त्याबद्दल सगळ्यांना खूप कुतूहल आहे. त्यामुळे याचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटक जात असतात.