आधीच उकाडा… त्यात घामटा निघाला; ठाण्याच्या घोडबंदरमध्ये पाच तास ब्लॅकआऊट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रविवारी सुट्टीच्या दिवशीच घोडबंदरमध्ये तब्बल पाच तास ब्लॅकआऊट झाल्याने ठाणेकरांचा चांगलाच घामटा निघाला. पहाटे सहा वाजल्यापासून खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणच्या कर्मचायांना पूर्ववत करण्यासाठी जवळपास दुपारचे बारा वाजले. घोडबंदर येथील पातलीपाडा उपकेंद्राला जोडणारी पडघ्यातील वीज वाहिनी ट्रिप झाली आणि जवळपास ६५ ते ७० हजार वीज ग्राहकांना त्याचा फटका बसला. आधीच उकाडा.. आणि त्यात घामटा निघाला अशी घोडबंदरवासीयांची स्थिती झाली.

कडक उन्हामुळे झळा सोसणाऱ्या ठाण्यातील घोडबंदरवासीयांना आज सकाळी पाच तास गर्मीत काढावे लागले. आता येईल, थोड्या वेळाने येईल या प्रतीक्षेत नागरिक लाईट येण्याची वाट बघत होते. अखेर पाच तासांनी हा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना यश आले. या बिघाडामुळे कोलशेत, वसंत विहार, मानपाडा, पातलीपाडा, कासारवडवली, ओवळा आणि गायमुखपर्यंतच्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. महापारेषणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीवकुमार यांच्या नेतृत्वाखाली संचालक सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार वाशी परिमंडळाचे मुख्य अभियंता महेश भागवत, अधीक्षक विजय आवारे यांच्या देखरेखीखाली दुरुस्तीचे काम सुरू होते.

चक्राकार पद्धतीने तात्पुरती व्यवस्था
महापारेषणने तत्काळ पर्यायी व्यवस्था उभारून कोलशेतचा भाग पहिल्या टप्प्यात पूर्ववत केला. तसेच उपलब्ध वीजपुरवठ्याच्या आधारे आजूबाजूच्या भागांमध्ये चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा सुरू ठेवण्याची तात्पुरती व्यवस्था केली होती.

पातलीपाडा परिसराला विद्युत पुरवठा करणारी २२० केव्हीची विद्यातकीपाडा परिसराला पुरवा करणारी २२० केव्हीची ट्रान्सफॉर्मरवर आला. काही तांत्रिक बिघाडामुळे पाच तास विद्युत पुरवठा खंडित होता. दुपारी बारानंतर टप्प्याटप्प्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व लाइन्स व्यवस्थित सुरू करण्यात आल्या.
– जयदीप नानोटे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता