अयोध्येचा फैसला सुनावणारे 5 न्यायमूर्ती सध्या काय करतात ?

22 जानेवारीला अयोध्येत उभारण्यात आलेल्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील आणि जगभरातील अनेक मान्यवर मंडळी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने 2019 साली रामजन्मभूमी संदर्भात ऐतिहासिक निकाल देणार्‍या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांनाही प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात आमंत्रित केले आहे. 2019 मध्ये निर्णय देणाऱ्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठात न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश होता.