महाराष्ट्रातील पाच खासदारांना ‘संसदरत्न’ पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

प्राइम पॉइंट फाऊंडेशन आणि आयआयटी चेन्नई यांच्यातर्फे दिला जाणारा ‘संसदरत्न’ पुरस्कार शनिवार, ८ जूनला दिला जाणार आहे. एकूण ७ खासदारांना हा पुरस्कार दिला जाणार असून यात महाराष्ट्रातील पाच खासदारांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे हिंगोलीचे खासदार राजीव सातव, शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक आणि भाजपच्या नंदुरबारच्या खासदार हीना गावीत यांचा समावेश आहे. खासदारांची हजेरी, चर्चांमधला सहभाग, प्रश्नसंख्या, खासगी विधेयके इत्यादी माहितीच्या आधारे खासदारांची निवड केली जाते.