
वेळः सकाळी 8 वाजता
देशाच्या स्वातंत्र्यदिनी दादर येथील शिवसेना भवनाच्या प्रांगणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या ध्वजारोहण केले जाणार आहे. याप्रसंगी पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत. सकाळी ठीक 8 वाजता हा ध्वजारोहण सोहळा होणार आहे.
असंख्य देशभक्तांचा त्याग आणि बलिदानामुळे हिंदुस्थानला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. या दिवशी स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला तिरंगा राष्ट्रध्वज फडकवून देशाप्रति आदर व्यक्त केला जातो. शिवसेनेनेही देशाभिमान सदैव जपला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी दिली जाणार आहे.
या ध्वजारोहण सोहळय़ाला मुंबईतील शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, विभागप्रमुख, लोकप्रतिनिधी, संलग्न संघटनांचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.

























































