
दिवाळीची लगबग सुरू झाली असून अनेकजण खरेदी करत आहेत. आता खरेदी करणाऱ्यांना आणखी चांगली संधी मिळणार आहे. फ्लिपकार्टवर लवकरच बिग दिवाळी सेल सुरू होणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक आकर्षक ऑफर देण्यात येत आहे.
याआधी फ्लिपकार्टचा सेल 23 ऑक्टोबरला संपला आहे. आता फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेल आणत आहे. हा सेल 28 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. आधीच्या सेलला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने फ्लिपकार्ट पुन्हा एकदा बिग दिवाळी सेल आणत आहे.
फ्लिपकार्टचा 28 ऑक्टोबरला सुरू होणार सेल 3 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ग्राहकांसाठी या सेलमध्ये बँक ऑफरही देण्यात आल्या आहेत. त्यासाठी फ्लिपकार्टने एसबीआयसोबत भागीदारी केली आहे. एसबीआयच्या कार्डद्वारे खरेदी केल्यास ग्राहकांना 10 टक्क्यांपर्यत सूट मिळणार आहे.
या सेलमध्ये इलेट्रॉनिक्स वस्तूंवर भरघोस सूट देण्यात येणार आहे. आयफओन्स, मोटोरोला आणि शिओमी फोनसाठी विशेष सेल पेज बनवण्यात येणार आहे. या वस्तूंवर 80 टक्क्यांपर्यंतची सूट मिळणार आहे. पॉवर बँक, डेस्कटॉप, हेडफोन्स, स्पिकर्स यावरही चांगली सूट देण्यात येत आहे.
टीव्ही आणि इतर वस्तूंवर 75 टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. याआधीच्या सेलमध्ये आयफोन 12 वर चांगली सूट देण्यात आली होती. रेडमीच्या फोनवरही फ्लिपकार्टने विविध ऑफर दिल्या आहेत. अॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरू असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर आणि सूट देत फ्लिपकार्टही पुन्हा एकदा बिग दिवाळी सेल सुरू करणार आहे.



























































