
केरळच्या कोझीकोडमध्ये फ्लोटिंग ब्रिज तयार करण्यात आला आहे. हा ब्रिज नदी नव्हे, तर समुद्रात तयार करण्यात आला आहे. समुद्राच्या लाटांबरोबर हा ब्रिज हवेत झुलतो.
फ्लोटिंग ब्रिज सुमारे 100 मीटर लांब आणि 3 मीटर रुंद असून त्यावर जाण्यासाठी पर्यटकांना लाईफ जॅकेट घालावे लागते. फ्लोटिंग ब्रिज हाय- डेन्सिटी पॉलिइथाइलीन ब्लॉकने तयार करण्यात आला आहे. पुलासाठी सात किलो वजनाचे 1300 ब्लॉक वापरण्यात आले आहेत. त्यांना गरजेनुसार कुठेही हलवता येते. तरंगत्या पुलावर फिरल्यावर आपण पाण्यावर चालत आहोत, असा भास होतो. सध्या 50 जणांना पुलावर जाण्याची परवानगी आहे. त्यासाठी सकाळी 11 ते सायंकाळी 6 एवढी वेळ निश्चित करण्यात आली आहे.



























































