पुरात लग्नाचा अल्बम खराब झाला, महिलेला करायचंय पुन्हा लग्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्न हा आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा असतो. वरवधुसाठी तो खूप खास क्षण असतो. त्यामुळे ते क्षण टिपून ठेवण्यासाठी, खास बनवण्यासाठी सगळीच जोडपी प्रयत्न करत असतात.

या आठवणी काही कारणाने खराब झाल्या तर खूप त्रास होतो. हा त्रास सहन करणाऱ्या एका महिलेने अल्बम बनवण्यासाठी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही घटना मलेशिया इथली आहे. मलेशियात गेल्या आठवड्यात पुराने थैमान घातलं होतं. या दरम्यान एक पत्रकार पुराचं कव्हरेज घेत पूरबाधितांची मुलाखत घेत होता. तिथे एका महिलेने आपल्या लग्नाचा फोटो अल्बम दाखवत त्याला तो पुरात खराब झाल्याचं म्हटलं.

इतक्या निगुतीने जपलेला अल्बम खराब झाल्यानंतर तो काही प्रकारे नीट करण्यापेक्षा महिलेचा भर पुन्हा लग्न करण्यावर होता. लग्नाचा सोहळा पुन्हा आयोजित करून हा अल्बम दुसऱ्यांदा बनवण्याचा निर्णय तिने घेतला आहे.