मास्टरशेफ फ्लॉएड कार्डोज यांचा कोरोनामुळे मृत्यू

हिंदुस्थानी खाद्यसंस्कृती जगभरात घेऊन जाणारे मास्टरशेफ फ्लॉएड कार्डोज यांचा 25 मार्च रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. फ्लॉएड हे 59 वर्षाचे होते. मुळचे हिंदुस्थानी असलेले फ्लॉएड हे अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये राहत होते. जगभरात शेफ फ्लॉएड, बॉम्बे कॅन्टीनसारखे त्यांचे अनेक रेस्टॉरंट आहेत. हिंदुस्थानी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्याप्रमाणात लोक या रेस्टॉरंटला भेट देतात.

महत्त्वाचे म्हणजे फ्लॉएड यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईत त्यांनी एका पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीत एकूण 200 जण असल्याचे म्हटले जात आहे. 8 मार्चपर्यंत फ्लॉएड हिंदुस्थानात होते. इथून अमेरिकेत पोहोचल्यानंतर त्यांना 18 मार्च रोजी कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना न्यूयॉर्कच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.

न्यूयॉर्कच्या रुग्णालयात त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोना झाल्याचे समोर आले. फ्लॉएड यांनी इस्टाग्रामवर याची माहिती दिली. तसेच इनस्टाग्रामवरील पोस्टमध्ये त्यांनी सर्वांची माफीही मागितली होती.

आपली प्रतिक्रिया द्या