फ्लाईंग पराठा

सोशल मीडियावर अनेकदा रंजक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही सेकंदांत असे व्हिडीओ देशाच्या कानाकोपऱयात पोचतात. असाच एक ‘फ्लाईंग पराठा’ व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. फ्लाईंग पराठा या नावावरूनच समजले असेल की, व्हिडीओ उडणाऱया पराठय़ाविषयी आहे. व्हिडीओत दोन व्यक्ती एकमेकांपासून लांब अंतरावर उभ्या आहेत. एक पराठा लाटण्याचे काम करतोय, तर दुसरा एका भल्यामोठय़ा तव्यावर एकाचवेळी अनेक पराठे शेकवण्याचे काम करतोय. पराठा लाटून झाल्यावर तो दुसऱयाच्या दिशेने हवेत भिरकावला जातो. इतक्या लांबच्या अंतरावरून पराठा थेट तव्यावर जाऊन पडत आहे. दिल्लीच्या सफदरजंग परिसरातील हा व्हिडीओ असल्याचे समजते. पराठा बनवण्याची या दोघांनी अनोखी स्टाईल देशभरात व्हायरल झालेय. हा व्हिडीओ नेटीजन्स मोठय़ा प्रमाणात शेअर करून कमेंट्स करत आहेत.

आपल्याकडे टॅलेंटची कमी नाही असे म्हणत अनेकांनी या दोघांची तुलना क्रिकेटपटूंशी केलेय. स्पिन, ड्रिफ्ट, डीप… सगळं काही आहे. काहींनी दोघांना थाळीफेक स्पर्धेत भाग घेण्याचा सल्ला दिलाय. फ्लाईंग पराठावाले बघून क्रिकेटचा खेळ आठवतोय, अशा प्रतिक्रिया नेटकऱयांनी व्यक्त केल्या आहेत. सराव माणसाला परिपूर्ण बनवतो, असे म्हणत अनेकांनी दोघांचे भरभरून कौतुक केले आहे.

क्रिकेटच्या मैदानात ज्याप्रमाणे कॅच घेतली जाते, अगदी तसाच काहीसा प्रकार या फूड स्टॉलवर दिसून येतो. पराठा उंच फेकणाऱयाच्या काwशल्याला दाद मिळत आहे