संभाजीनगर शहरावर पसरली धुक्याची चादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी आणि अतिवॄष्टीने मोठा फटका बसला. त्यातच वाहिनी चक़ीवादळाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता शहरातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. रविवारी पहाटे संपूर्ण संभाजीनगर शहरावर दाट धुके पसरले होते. तब्बल दोन तास शहर धुक्यामध्ये दडून गेले होते.

राज्यात यंदा पावसाचा मोठा फटका बसला आहे. सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला. नद्यांना पूर येऊन त्या दुथडी भरून वाहत आहेत. पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी जमीन खरडून निघाली आहे. खरीपाची पिके नष्ट झाली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या चक़ीवादळाचा जबरदस्त तडाखा जिल्ह्याला बसला. त्यातच ढगफुटीने कहर केला. सर्वत्र पाणीच पाणी आणि चिखल झाला. पावसात रस्ते वाहून गेले तर पुलांची पडझडही झाली. त्यातच नवरात्रोत्सव सुरू झाला. घराघरात आईचा उदोउदो, अंबाबाईचा गजर ऐकायला येत आहे. त्यातच वातावरणात आल्हाददायाक बदल होत आहे. शहरावर धुक्याची चादर पसरल्याने पहाटे शहरात गारवा होता.

निसर्गाचे अल्हाददायक व मनमोहक वातावरण सकाळी पाहायला मिळाले. पहाटे 5 वाजेपासून धुके पडू लागले. सहा ते सात वाजेदरम्यान संपूर्ण संभाजीनगर दाट धुक्यात होते. धुके इतके दाट होते की बाजूची इमारत, रस्ते दिसत नव्हते. मार्निंग वॉकला निघालेल्या नागरिकांनी या वातावरणाचा आनंद लुटला.